तो ....
तो ऑफिस मध्ये नवीन असतो..
आला की सगळयांच्या नजरेत भरतो...
पण बिचारा लगेच निघून कैंटीन गाठतो..
मित्रांच्या टोळीत जाउन रमतो ....
अन स्वत:च्याच नशीबावर मनमुराद हसतो...
तो..
कारण तो अजून बेंच वर असतो....
Office ला जाणे काही त्याला mandatory नाही ..
पण पठ्ठ्या आपली Punctuality पाळतो.....
बेंचवरच्या पोरांना कडकडून भेटतो -
प्रोजेक्ट वरच्या मित्रांना मात्र जाणून बुजुन टाळतो ....
तो आतून पूर्णपणे खचलेला असतो....
पण चेहऱ्याने मस्त Artificial हसतो....
तो..
कारण तो अजून बेंच वर असतो....
त्याला आजही रोज घरून फ़ोन येतो -
तो आजही रोज घरी फ़ोन करतो...
ऑफिसच्या खोट्या - खोट्या गप्पा सांगतो -
कामाचं विचारलं की थोडासा टरकतो....
आवाजात थोडा खरेपणा आणतो....
आणि म्हणतो -
अगं मम्मी, मी तर दिवसभर कामातच असतो...
तो..
कारण तो अजून बेंच वर असतो....
त्याचा Lunch Time, Tea-Break काही फिक्स नाही.....
पण रोजचं Schedule खुप मस्त आहे...
कामाच्या नावाने रोज बोंबा आहेत...
गप्पा आणि टाइमपास जरा जास्त आहे.....
RMG ची meeting म्हटली की त्याचा आत्म-विश्वास दुणावतो....
स्वत: च्या future बद्दल तो नेहमीच Positive असतो...
तो..
कारण तो अजून बेंच वर असतो....
तो कॉलेज मध्ये बऱ्याचदा नापास व्हायचा ....
सुट्ट्या मध्ये त्याचे मित्र घरी जायचे-
आणि तो Improvement च्या Exam द्यायचा .....
त्याच्या Life च्या Tragedy मध्ये जराही बदल नसतो ...
फरक फ़क्त इतकाच -
कॉलेज मध्ये Exam होती आणि
ऑफिस मध्ये बेंचवर असतो...
तर अशी ही एका बेंच वरच्या पोराची कहानी ..
त्याच्या डोळ्यांत कधी आशेचे किरण,कधी निराशेचे पाणी...
पण शेवटी तोच जिंकणार आहे..
जिंकने तर त्याच्या रक्तात आहे..
हजार वादळ थांबवण्याची ताकद
त्याच्याही मनगटात आहे..
तो पुरून साऱ्या संकटांना
पुन्हा एकदा सांगेल जगाला....
"चल भाय पार्टी है आज
साला आपल्याला पण प्रोजेक्ट मिळाला..... "
No comments:
Post a Comment